कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सुनिल साळुंखे यांनी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...!! सौ. संगीता इंनकर ( सात...
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सुनिल साळुंखे यांनी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...!!
सौ. संगीता इंनकर ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलात प्रथमच नव्याने दाखल झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आदरणीय सुनील जी. साळुंखे यांनी पोलीस मुख्यालयात हजर राहून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशात त्यांनी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय बाळासाहेब भालचिंम साहेब यांच्या रिक्त जागेवर वाई उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे हे यापूर्वीं सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ,जत या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिंम यांनीही वाई विभागात गेले सव्वादोन वर्षापासून उत्कृंष्ट कामकाज पाहिले होते. त्यांनीही यापूर्वी नागपूर शहर,नांदेड सोलापूर,मुंबई कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यात आपली प्रदीर्घ सेवेत गुणवत्तापूर्ण उत्कृंष्ट कामकाज केले होते. त्यांच्या कामाची पद्धत नेहमीच वेगळी राहिली आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करून बरोबर घेवुन जाण्याची त्यांची शैली होती. तपास कामातही त्यांचा चांगलाच हातखंड होता. त्यांच्या उत्कृंष्ट कामाची दखल देखील राज्य गृह विभागाने चांगलीच घेतली होती. त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक आणि राष्ट्रीय पदकांने सन्मानित करण्यात आले होते. सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी वाई येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्कृंष्ट आपली सेवा दिली. पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य प्रथम न्याय आणि खाकी वर्दींतील आपलेपणा प्रेमळ आणि मनमिळावू असा त्यांचा स्वभाव वाई विभागांच्या पोलीस खात्यात आणि सर्वसामान्य जनतेत कायम राहिला.

No comments