adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात गोळा फेक स्पर्धा उत्साहात संपन्न

 खडसे महाविद्यालयात गोळा फेक स्पर्धा  उत्साहात संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मुक्ताईनगर:- मुक्ताईन...

 खडसे महाविद्यालयात गोळा फेक स्पर्धा  उत्साहात संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मुक्ताईनगर:- मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे गोळा फेक स्पर्धा   नुकत्याच संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी  आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाविषयीचे नियम व तंत्र समजावे .यासाठी क्रीडा विभागामार्फत अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात दिनांक 13 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी पुरुष व महिला या गटांसाठी  घेतलेल्या स्पर्धांमधून पुरुष गटात साहिल गुरचळ प्रथम क्रमांक तर सुरज सोलंके याने द्वितीय क्रमांक  ,तर महिला गटात ममता खोंदले प्रथम क्रमांक तर हर्षदा नागरुत हिने द्वितीय क्रमांक पटकाविला .विजयी खेळाडूंना बक्षीस प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे क्रीडा विभागाने 'मैदानाकडे चला 'या कार्यक्रमा अंतर्गत मा. प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन ,उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक डॉ.प्रतिभा ढाके यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण केली.

No comments