adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शनिशिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील..विश्वस्त मंडळ बरखास्तीनंतर कागदपत्र हेराफेरीची शक्यता;पोलिस बंदोबस्तात कारवाई

 शनिशिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील..विश्वस्त मंडळ बरखास्तीनंतर कागदपत्र हेराफेरीची शक्यता;पोलिस बंदोबस्तात कारवाई  सच...

 शनिशिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील..विश्वस्त मंडळ बरखास्तीनंतर कागदपत्र हेराफेरीची शक्यता;पोलिस बंदोबस्तात कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२७):-जगप्रसिद्ध अहिल्यानगरातील शनि शिंगणापूर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय जिल्हा प्रशासनाने शनिवारी सील केले. जिल्हाधिकारी स्वतः पोलिस बंदोबस्तासह देवस्थानवर दाखल झाले आणि कार्यालय सील करण्याची कारवाई केली. या घटनेमुळे मंदिर परिसर व विश्वस्त मंडळात मोठी खळबळ उडाली आहे.शनि शिंगणापूर देवस्थानवरील विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर येथे कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याची बाब समोर आली होती. विश्वस्त मंडळावरील भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच तातडीने ही कारवाई केली.कार्यालय सील करताना देवस्थानचे कार्यकारी अधिकारी मात्र अनुपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिस बंदोबस्त, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.या कारवाईनंतर आता शनि शिंगणापूर देवस्थानचा संपूर्ण कारभार शासनाकडे जाणार आहे. मंदिर व्यवस्थापनातील अनियमितता रोखण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी प्रशासनाने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

No comments