adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोठला स्टॅन्ड परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मुंडके व मांस फेकणारा अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड

  कोठला स्टॅन्ड परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मुंडके व मांस फेकणारा अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड   सचिन मोकळं अहि...

 कोठला स्टॅन्ड परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मुंडके व मांस फेकणारा अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड  


सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१७):-गोवंश जनावरांची कत्तल करुन,कत्तलीतील मासाचे उर्वरीत अवशेष कोठलास्टँड  येथे फेकणारा आरोपी अवघ्या 06 तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,भिंगार कँम्प पोस्टे येथे दाखल गुरनं 505 / 2025 भारतीय न्याय संहीता 325,271 सह महा.पशु संरक्षण अधिनीयम 2015 चे कलम 5 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच याप्रकरणी काल आमदार संग्राम जगताप व आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली कोठलास्टॅन्ड येथे हिंदुत्ववादी संघटनांनी रस्ता रोको केला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना तात्काळ नमुद गुन्हयातील आरोपीची माहिती घेवुन अटक करणेबाबत आदेशित करुन, वेगवेगळे पथके करुन रवाना केले.व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती प्रमाणे गुन्ह्याचे ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्या वरील दोन इसमांचा शोध घेतला असता.सदरची गाडी हि आरोपी नामे तरबेज आबीद कुरेशी (वय 24 वर्षे,रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट,ता.जि.अहिल्यानगर) याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने,त्याचा शोध घेतला असता,तो मिळुन आला. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगीतले की,त्यांने दोन गोवंशीय बैलांची राहते घरी कत्तल करुन,त्याचे मांस विक्री केले आहे.नंतर कत्तलीतील वेस्ट मासं व अवशेष हे फेकुन देणे करीता ओळखीचे दोन विधीसंघर्षीत बालक यांना मोपेड गाडी देवुन,त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले.सदर वेस्ट मांस व अवशेष हे त्यांनी कोठला बसस्थानक रोड कडेला फेकुन दिले.आरोपी यांचेकडून नमुद गुन्हयात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून, विना नंबरची जुनी वापरती मोपेट गाडी रु. 40,000/- किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.ताब्यातील आरोपी तरबेज आबीद कुरेशी,वय 24 वर्षे,रा. व्यापारी मोहल्ला,झेंडीगेट,ता. जि.अहिल्यानगर आणि विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी रु. 40,000/- किमंतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ दिपक घाटकर,पोहेकॉ/सुनिल पवार,पोहेकॉ/गणेश धोत्रे, पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/ फुरखान शेख,पोना/भिमराज खर्से,पोकॉ/सतिष भवर,/पोकॉ योगेश कर्डीले,पोकॉ/प्रशांत राठोड,मपोहेकॉ/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/छाया माळी यांनी केलेली आहे.

No comments