adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला

 अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२७):-ओबीसी आ...

 अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२७):-ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर शनिवारी सकाळी अज्ञात तरुणांनी नगर तालुक्यातील आरणगाव शिवारातील बाह्य वळण रस्त्यावर काठ्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.लक्ष्मण हाके हे सकाळी देऊळ नांदूर (ता. पाथर्डी) येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेसाठी निघाले होते. दरम्यान, काही युवकांनी त्यांच्या वाहनाला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत लक्ष्मण हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

No comments