adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला सुरक्षा व महिला सबलीकरण विषयावर पोस्टर स्पर्धा संपन्न...

 महिला सुरक्षा व महिला सबलीकरण विषयावर पोस्टर स्पर्धा संपन्न...  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा.येथील इनर व्हील क्लब ऑफ,...

 महिला सुरक्षा व महिला सबलीकरण विषयावर पोस्टर स्पर्धा संपन्न... 



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा.येथील इनर व्हील क्लब ऑफ, चोपडा व भगिनी मंडळ संचालित, ललित कला केंद्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच एक समाज प्रबोधन पर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात ए.टी.डी. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. व्यक्तिचित्र प्रदर्शनासाठी महिला सबलीकरण व महिला सुरक्षा असे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाला अनेक प्रकारचे चित्रांमधून व घोषवाक्यातून संदेश दिलेत.त्यात महिलांना शिकवा महिलांना वाचवा त्यांना त्यांचे हक्क द्या महिला शिकल्या तर देश पुढे जाईल..महिलांवरील अन्याय असे सुचक संदेश समाजापर्यंत देण्यात आले. 


             प्रदर्शनात देवांशी जितेंद्र कुमार पित्रोडा (धरणगाव) ए.टी.डी. द्वितीय वर्ष हिला प्रथम क्रमांक चे.- पार्थ योगेश महाजन (अमळनेर) याला द्वितीय क्रमांकाचे तर विवेक सुनील पाटील चोपडा ए.टी.डी. प्रथम वर्ष याला तृतीय क्रमांकाचे तसेच सुरेखा सुरसिंग पवार (पाचोरा) तर अव्वाब सिराज हलवाई (चोपडा) यांना उत्तेजनार्थ बक्षीस स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र या स्वरूपात देण्यात आले . याप्रसंगी येणार व्हीलच्या अध्यक्षा सौ. भारती बोरसे, उपाध्यक्ष नीतू अग्रवाल,सेक्रटरी शैला सोमानी, खजिनदार सीमा पाटील, आयएसओ वंदना पाटील, अंजली देशमुख,सल्लागार अश्विनी गुजराथी व सौ. पुनम आशिषलाल गुजराथी, अध्यक्षा, भगिनी मंडळ चोपडा तसेच प्राचार्य सुनील बारी,प्रा. विनोद पाटील,श्री. भगवान बारी, अतुल अडावदकर प्रवीण मानकरी व समस्त विद्यार्थी परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय नेवे यांनी केले तर प्रा. विनोद पाटील यांनी आभार मानले. 


No comments