adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रासेयो सप्ताह व सेवा पंधरवडा निमित्त यावल महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न

 रासेयो सप्ताह व सेवा पंधरवडा निमित्त यावल महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  जळ...

 रासेयो सप्ताह व सेवा पंधरवडा निमित्त यावल महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे,येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल एन.एस.एस. विभागामार्फत सेवा पंधरवडा व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवाडा व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न झाले,यात महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच आपल्या गावात व परिसरात वृक्ष लावण्यासाठी इच्छुक असलेल्या रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांना वृक्षांचे देखील वाटप करण्यात आले.

वृक्षारोपणा आधी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छता केली,

त्यानंतर विद्यार्थ्यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.तसेच त्यांनी भारताची एकात्मता व अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची माहिती दिली. व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने त्यांना प्रोजेक्टरवर कारगिल विजय दिवसाची शौर्यगाथा याची माहिती दाखविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे,उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी.वसावे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली शिरसाठ  आदींसह स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments