कर्जाणे आदिवासी संस्कृतीत गाव शिवार आराखडा ग्रामविकासाला नवे बळ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज कर्जाणे आदिवासी परंपरा, श...
कर्जाणे आदिवासी संस्कृतीत गाव शिवार आराखडा ग्रामविकासाला नवे बळ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज कर्जाणे आदिवासी परंपरा, श्रद्धा आणि जीवनशैली जपत येथे प्रथमच गाव शिवार आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा केवळ विकासाची नकाशा न ठरता, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन यावरही भर देतो. ग्रामसभेच्या सहभागातून तयार झालेल्या या आराखड्यात पारंपरिक देवस्थाने, पवित्र झाडे, पारंपरिक पाणवठे, जत्रा-उत्सवाच्या जागा, शिकारी-संकलन क्षेत्रे तसेच आधुनिक शेती व जलसंधारणाची साधने यांचा समन्वय साधण्यात आला आहे.
त्यामुळे विकास आणि परंपरा या दोन्हींचा संगम साधला गेल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. पी. माहुरे ( सहाय्यक् प्रकल्प अधिकारी यावल) हे होते, त्यांनी शिवार फेरी बाबत महत्वपूर्ण माहिती दिली, तसेच कर्मयोगी या माध्यमातून गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा असे कर्जाने गावाचे उपसरपंच प्रमोद बारेला यानी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक लोकनेते, आदिवासी समाजातील ज्येष्ठ मंडळी, युवक व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आमच्या संस्कृतीचे जतन करताच विकासही शक्य आहे” असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. प्रशासनानेही या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे आदिवासी संस्कृतीला व गावाच्या शाश्वत विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्जाने आश्रमशाळेचे प्राथमिक शिक्षक रामचंद्र आखाडे यांनी केले. कार्य क्रम यशस्वितेसाठी सर्व गावातील ग्रामसेवक,ग्रामस्थ, सरपंच उपसरपंच,सदस्य,जिल्हा परिषद शिक्षक वृंद ,अंगणवाडी ताई, आशा ताई , बचत गटाच्या महिला,कृषी विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे आधिकारी, कर्जाने आश्रमशाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी या संपूर्ण कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊन गाव शिवार फेरी पूर्ण करण्यात सहभाग नोंदविला
No comments