कर्जाणे गावातील आदिवासी केसरी रेशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा सद्या दिवा...
कर्जाणे गावातील आदिवासी केसरी रेशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा सद्या दिवाळी चालू असताना गरीब लोकांना अन्नधान्य शिवाय साजरी होत नसते तसेच कर्जाणे गावातील आदिवासी समाजातील नागरिकांना सात वर्षांपासून वाट पाहत असलेला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अखेर मिळाला आहे. गावातील केसरी रेशन कार्ड धारकांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तांदूळ, गहू अशा धान्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
गेल्या सात वर्षांपासून अनेक आदिवासी कुटुंबे फक्त नावापुरती रेशन कार्डधारक होती, परंतु त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता.गावाचे उपसरपंच प्रमोद बारेला व रेशन दुकानदार बबलू बारेला यांनी सतत पाठपुराव्यानंतर मा.तहसीलदार साहेब यांनी ही बाब लक्षात घेत तत्काळ अन्न सुरक्षेच्या आदेश काढून कार्यवाही केली.तसेच चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचेही मार्गदर्शन मोलाचे लाभले
तसेच गावातील रहिवासी दारासिंग म्यानसिंग बारेला यांनी सांगितले की, “आता आम्हाला दर महिन्याला अन्नधान्य मिळू लागल्यामुळे घरचा खर्च कमी झाला असून दिलासा मिळाला आहे.”
या उपक्रमामुळे गावातील सात आदिवासी कुटुंबांना अन्न सुरक्षेअंतर्गत थेट फायदा होणार आहे. स्थानिक प्रशासनाने पुढील काळात अशा इतर वंचित कुटुंबांनाही योजना जोडण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रतिक्रिया
उपसरपंच प्रमोद बारेला
ग्रामपंचायत कर्जाने
माझ्या गावासह इतर गावातही भरपूर केसरी कार्डधारकांना आतापर्यंत अन्नसुरक्षा च्या लाभापासून वंचित आहे तरी चोपडा तहसीलदार याकडे विशेष लक्ष देऊन प्रत्येक रेशन दुकानदारांना सूचना देऊन कागदपत्रे मागणी करून त्यांना अन्नधान्य चा देण्यास सहकार्य करावे

No comments