महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईकडून संपादक लियाकत खान पठाण यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरव बीड।एस.एम.युसूफ़ (संपादक -:- हेमकां...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईकडून संपादक लियाकत खान पठाण यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरव
बीड।एस.एम.युसूफ़
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहेमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक खरे सव्वाशेर चे संपादक लियाकत खान पठाण यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईकडून प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
संपादक लियाकत खान पठाण हे जरी अहेमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून आपले वृत्तपत्र खरे सव्वाशेर प्रकाशित करीत असले तरी त्यांची अभ्यासू आणि चोखंदळ नजर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांवर असते. महाराष्ट्रभरातून जे पत्रकार परखड, सडेतोड, निर्भीड आणि अभ्यासू लिखाण करीत असतात अशा पत्रकारांनी लिहिलेल्या बातम्या व लेख त्यांच्या दृष्टीस पडले, की ते अशा पत्रकारांच्या लिखाणाला न डावलता आपल्या वृत्तपत्रात स्थान देतात, आवर्जून प्रकाशित करतात. ही बाब मी या बातमीच्या माध्यमातून लिहितोय एवढी सोपी निश्चित नाही. असा चोखंदळपणा अंगी बाळगणे हे सहज सोपे नाही मात्र ही उल्लेखनीय बाब खान साहेबांनी आत्मसात केली आहे. अशाच प्रकारे मी करत असलेले लिखाण सुद्धा जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हापासून त्यांनी माझे लिखाण सुद्धा खरे सव्वाशेर वृत्तपत्रात न चुकता प्रकाशित केले आहे व करीत आहेत. यासाठी मोठ्या मनासह अभ्यासू वृत्तीही लागते आणि ती खानसाहेबांमध्ये निश्चित आहे म्हणूनच संगमनेर तालुक्यातून जरी खरे सव्वाशेर हे वृत्तपत्र प्रकाशित होत असले तरी त्यात प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्या आणि लेख पाहता सहज लक्षात येते, की ते फक्त संगमनेर तालुका किंवा अहेमदनगर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रभरातील अनेक जिल्हे आणि तालुक्यातील बातम्या या वृत्तपत्रात सहज दिसतात. यामागे वृत्तपत्र चालवितानाची तपस्या सहज लक्षात येते. याशिवाय खान साहेब आपले वृत्तपत्र चालवितानाच आपल्या जवळचे, दूरचे किंवा परिचयाचे कुणीही असो जे संपादक वृत्तपत्र चालवितात अशा अनेक संपादकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासतात. त्यांच्या या गुणामुळेच महाराष्ट्र भरातील अनेक वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार त्यांच्यासोबत जुळलेले आहे. लियाकत खान पठाण साहेबांच्या अशाच परोपकारी वृत्तीमुळे मी सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून खान साहेबांच्या खरे सव्वाशेर वृत्तपत्रासोबत जुळलोय. त्यांच्या दैदीप्यमान कार्याकडे पाहून त्यांची नोंद घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईने त्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. याबद्दल खान साहेबांसह खरे सव्वाशेर वृत्तपत्र आणि संपूर्ण चमुचे खूप-खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा तसेच यापुढेही खान साहेबांचे सहकार्य, प्रेम आणि मार्गदर्शन सदैव आम्हा सर्व पत्रकार बांधवांना मिळत रहावे अशा सदिच्छा व्यक्त करतो.

No comments