ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी तसेच दयानंद सरस्वती मार्गाच्या कॉर्नरला लाईट बसण्याची निलेश चोपडे यांची निवेदनाद्वारे मागणी अमोल बावस्का...
ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी तसेच दयानंद सरस्वती मार्गाच्या कॉर्नरला लाईट बसण्याची निलेश चोपडे यांची निवेदनाद्वारे मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर :- तालुक्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भागात डासाचा उपद्रव खुप वाढल्याने ग्रामपंचायतीने बन्सीलाल नगर भागांमध्ये धूर फवारणी करावी तसेच दयानंद सरस्वती मार्गाच्या कॉर्नरला लाईट बसण्याची मागणी निलेश चोपडे यांनी एका निवेदन द्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर तालुक्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भागांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सद्याच्या परिस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने मन मन तसेच तण झालेले आहे.
सर्वीकडे अस्वच्छता दिसून येत असल्याने स्थानिक नागरीक त्रस्त झाले असून यामध्ये वयोवृद्ध तसेच बालके असून हे आजारी पडताना दिसतात त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पावले उचलावीत व धूर फवारणी करून तसेच लाईट बसवून द्यावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे.सदरच्या काळ हा सणासुदीचा असून याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे.
जर निवेदनावर कारवाई झाली नसल्यास व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची तक्रारी वाढल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत जबाबदार राहिलं असा इशारा ही निलेश चोपडे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

No comments