डॉ. कृष्णा गायकवाड यांना मुक्ता साळवे नॅशनल अवॉर्ड जाहीर सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर येथील श्रीमती ज...
डॉ. कृष्णा गायकवाड यांना मुक्ता साळवे नॅशनल अवॉर्ड जाहीर
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी . जी.खडसे महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. कृष्णा गायकवाड यांना मुक्ता साळवे नॅशनल बेस्ट टीचर्स अवॉर्ड 2025 दिनांक -6 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रँड यशोदा सभागृह बीड येथे प्राप्त झाला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये डॉ. गायकवाड यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरात विविध राज्यातील शिक्षकांची या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आली होती. त्यामध्ये विविध राज्यातून अनेक शिक्षकांनी आवेदन करून या पुरस्कारासाठी प्रयत्न केले . सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक विषयाला अनुसरून या पारितोषकासाठी मानांकन देण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. कृष्णा गायकवाड यांना हा अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
डॉ. गायकवाड हे गेल्या पंधरा वर्षापासून खडसे महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर व हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तद पश्चात त्यांची तीन नॅशनल पुस्तके प्रकाशित आहेत तसेच यूजीसीचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आहे. वर्तमानपत्रांमध्ये विविध विषयावर संपादकीय लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे. सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचे कार्य निरंतर सुरू आहे.
या पुरस्काराबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा एड. रोहिणीताई खडसे खेवलकर, सचिव डॉ.सी.एस. (दादा) चौधरी, उपाध्यक्ष श्री नारायण चौधरी व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, डॉ. वंदना चौधरी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


No comments