नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आगामी सिहस्थ कुंभमेळ्या...
नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार
-जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत शासनाने मोठे फेरबदल केले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपला कार्यभार स्वीकारला प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या तयारीस गती देण्याबरोबरच नाशिक शहराच्या ब्रँडिंगवरही विशेष भर देणार आहेत.
आयुष प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून भारतीय प्रशासनिक सेवेच्या २०१५ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.

No comments