adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पूरग्रस्त भागात चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून मदत रवाना....

 पूरग्रस्त भागात चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून मदत रवाना....  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ....शेतकरी कृती समिती व सम...

 पूरग्रस्त भागात चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून मदत रवाना.... 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

....शेतकरी कृती समिती व समविचारी व्यक्ती यांच्या आवाहनास प्रतिसाद देत चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वह्या गोळा केल्यात तर इतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने वह्या,पेन ताट,ग्लास, पांघरायला रग,अश्या साहित्यांचे २५०किट व सोबत पाच हजार वह्या असे मदतीचे साहित्य गोळा झाले होते.आज रोजी ते साहित्य घेऊन गाडी नांदूर हवेली,खामगाव, हिरापूर  ह्या १००%बुडीत गावांमध्ये रवाना झाली.उद्या येथील शाळांमध्ये ॲड कुलदीप पाटील,तुषार सूर्यवंशी, योगेश दुसाने, गुणवंत सोनवणे यांच्या समक्ष तेथे वाटप होणार असून गाडी रवाना करताना एस बी पाटील, डॉ सुभाष देसाई, हरिश्चंद्र देशमुख, प्रा प्रदीप पाटील, नारायण बोरोले, काशिनाथ महाजन, प्रा सागर धनगर, विपीन बोरोले, प्रदीप सोनार, हरीभाऊ गुजर,अजित पाटील, धनंजय पाटील, मोहित बोरोले, प्राचार्य आर बी वाघजाळे, प्रा ए एन बोरसे, डॉ रवींद्र पाटील, गणेश पाठक हजर होते.

No comments