जातीभेद करणाऱ्या महिला सरपंचाने व सरपंच पतीने बौद्ध विधवा महिलेचे राहते घर जेसीबीने पाडले.. सरपंचाच्या घरासमोर व शाळेसमोर बौद्ध महिलेचे घर ...
जातीभेद करणाऱ्या महिला सरपंचाने व सरपंच पतीने बौद्ध विधवा महिलेचे राहते घर जेसीबीने पाडले..
सरपंचाच्या घरासमोर व शाळेसमोर बौद्ध महिलेचे घर असल्याने उध्वस्त केले.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ ?
लातूर,दि.१७ (उत्तम माने)
संपादक हेमकांत गायकवाड
मौजे कारला ता.औसा जिल्हा लातूर येथील बौद्ध विधवा महिलेचे राहते घर जेसीबी च्या सहाय्याने उध्वस्त केल्याची घटना दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली त्यामुळे बौद्ध महिला व महिलेची वृद्ध आई आता रस्त्यांवर आलेल्या आहेत.त्यांना ना घर ना काही सुविधा नसल्याने त्या बेघर रस्त्यावर भटकंती करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे कारला तालुका औसा जिल्हा लातूर येथील महिला आपल्या आईसोबत राहत असून मिळेल ती मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह भागवीत असते.त्या रहात असलेल्या घराची जागा ही तिचे वडील दादाराव गोविंद कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने इ.सन १९८३ साली मालकी हक्काची जागा व कबाला दिलेला आहे.ज्याचे क्षेत्रफळ हे ३३ बाय ३३ असून त्या जागेवर मागील ४२ वर्षापासून पत्र्याची शेड बांधून बौद्ध महिला राहत आहे.आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाकडून नळ दिलेले होते. विद्युत मंडळाकडून विज जोडणी दिलेली आहे.आजतागायत घरपट्टी भरलेली आहे.घरासमोरून जाणारा कुमठा ते किल्लारी हा मुख्य रस्ता असून घरापाठीमागे गावातील सवर्ण समाजातील सुरेश सोपान पवार यांचे घर असून त्यांच्या घरापाठीमागे त्यांचीच शाळा स्व.सौ.केशराई विद्यालय कारला असून घर हे रोडलगत असून जातीभेद करणाऱ्या सरपंच अलका पवार यांची शाळा व घर आहे.सदरील शाळा व घर हे बौद्ध महिलेच्या घरा पाठीमागे असल्याने व या गावच्या विद्यमान सरपंच अलका सुरेश पवार या असल्याने त्यांच्या पोटात पोटशूळ उठल्याने त्यांनी अनेकवेळा जातिवाद निर्माण होईल अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करत तुझे घर माझ्या शेजारी नको म्हणून आता तर मी सरपंच झाली आहे.पाठीमागे माझी शाळा आहे.
कसल्याही परिस्थितीत तुझे घर ठेवणार नाही म्हणून धमकी दिली.व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला हाताशी धरून दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सरपंच सौ.अलका सुरेश पवार,त्यांचे पती सुरेश सोपान पवार, ग्रामसेवक जगन्नाथ गिरी,सार्वजनिक बांधकाम विभाग(औसा)चे सहाय्यक अभियंता रोहन जाधव,सौ.अनुसया नामदेव घोडके व इतर तोंड बांधून आलेल्या ०४ ते ०५ महिला व ०४ ते ०५ पुरुष मिळून माझ्या राहत्या घरी येऊन विनापरवाना प्रथम अलका सुरेश पवार यांनी माझ्या केसाला पकडून खाली पडली व सुरेश पवार यांनी मला लाथा घातल्या व तोंड बांधून आलेल्या अनोळखी महिलांनी व पुरुषांनी फरफटत घराबाहेर काढून मला व माझ्या आईला चापटाने लाथा बुक्यांनी मारहाण केली.गावातील सार्वजनिक ठिकाणी मायलेकीचा अपमान केला.त्यामुळे आता त्यांना जीवन जगणे कठीण झाले असून बेघर केल्याने त्या मरण यातना भोगत आहे.रस्त्यावर भटकत फिरण्यापेक्षा आता स्वहत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही.अशी व्यथा प्रतिनिधीशी बोलतांना पीडित महिलांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.


No comments