adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दीपावलीचे औचित्य साधून आ. अभिमन्यू पवार औसा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला २५ शिलाई मशिन्स आणि ५० विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्या.

 दीपावलीचे औचित्य साधून आ. अभिमन्यू पवार औसा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला २५ शिलाई मशिन्स आणि ५० विद्यार्थिनींन...

 दीपावलीचे औचित्य साधून आ. अभिमन्यू पवार औसा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला २५ शिलाई मशिन्स आणि ५० विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्या. 


लातूर जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा आत्मा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून, सर्व कार्यकर्ते अंत्योदयाच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन कार्यरत आहेत.


दीपावलीचे औचित्य साधून आणि अंत्योदयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, भटके विमुक्त देवगिरी प्रांत सहसंयोजक श्री सुधाकरजी कुलकर्णी, भटके विमुक्त राष्ट्रीय कार्यवाह श्री नरसिंगजी झरे व भटक्या विमुक्तांचे लिंबराज जाधव, विजयकुमार माने, प्रा. अशोकजी तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज औसा विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला 25 शिलाई मशिन्स आणि 50 विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्या. भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या घरात स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री जयप्रकाशजी दगडे, चंद्रकांतजी जेरिगुंटे, संगमजी कोटलवार, पत्नी सौ. शोभा पवार, भाजप परिवारातील सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते. 

No comments