महिलांच्या सक्षमीकरणात बंधन बँकेचे ऐतिहासिक योगदान..३ कोटी महिला स्वावलंबनाकडे..१८ कोटी वंचित नागरिकांना प्रगतीचे दरवाजे उघडले सचिन मोकळं...
महिलांच्या सक्षमीकरणात बंधन बँकेचे ऐतिहासिक योगदान..३ कोटी महिला स्वावलंबनाकडे..१८ कोटी वंचित नागरिकांना प्रगतीचे दरवाजे उघडले
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.६): भारतीय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बंधन बँकेने उभारलेले कार्य ऐतिहासिक ठरले आहे. देशभरातील सुमारे ३ कोटी कष्टकरी आणि गरीब महिलांना त्वरित लघु अर्थसहाय्य देऊन त्यांच्या कुटुंबातील सुमारे १८ कोटी वंचित नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीचे दरवाजे उघडले,असे प्रतिपादन बंधन बँकेचे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विभागाचे प्रमुख नीलांजन जरीयट यांनी केले.
महिला सक्षमीकरणासाठी बंधन बँकेची “भीम” कामगिरी
बंधन बँकेच्या सामाजिक दायित्व योजना (CSR) अंतर्गत देशभरातील वंचित घटकांसाठी १८ दर्जेदार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात स्नेहालय संस्थेला वैद्यकीय सेवेसाठी सुसज्ज रुग्णवाहिका देऊन करण्यात आली.
या प्रसंगी नीलांजन जरीयट, प्रादेशिक प्रमुख व्ही. एस. सुब्रमण्यन, अहिल्यानगर शाखा व्यवस्थापक विशाल लोंढे आणि अमित आढाव, तसेच स्नेहालय संस्थेच्या अध्यक्ष जया जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, खजिनदार गीता कौर, मुख्य पालक राजीव गुजर, संचालक हनीफ शेख आणि अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते
बंधन बँकेची वाटचाल : स्वयंसेवी संस्थेकडून राष्ट्रीय बँकेपर्यंत नीलांजन जरीयट यांनी यावेळी सांगितले की, बंधन बँकेची पायाभरणी श्री. चंद्रशेखर घोष यांनी केली. वर्ष 2001 मध्ये महिलांना रोजगार संधी व अर्थसहाय्य देणारी स्वयंसेवी संस्था म्हणून तिची सुरुवात झाली. यानंतर वर्ष 2014 मध्ये ही महिला सक्षमीकरणाची चळवळ “बंधन बँक” म्हणून कार्यरत झाली. श्री. सुब्रमण्यन यांनी माहिती दिली की, मागील ११ वर्षांत भारतातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ६३६० शाखांचे जाळे उभे करण्यात आले असून, यातील ७३ टक्के शाखा ग्रामीण महिलांसाठी कार्यरत आहेत. बँकेची अनामत मालमत्ता १,९१४.८ दशलक्ष कोटी रुपये, तर ठेवींची रक्कम १,५२१ दशलक्ष रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले
अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सज्ज
अहिल्यानगर शाखा व्यवस्थापक विशाल लोंढे यांनी सांगितले की, स्नेहालय व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील कष्टकरी महिलांसाठी विशेष आर्थिक सक्षमीकरण योजना राबविण्याची तयारी बंधन बँकेने केली आहे. बंधन बँकेकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे गरजू नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा पुरविण्याची योजना श्री. हनीफ शेख यांनी सादर केली.
🌹 बंधन बँकेचा सामाजिक उपक्रम – सेवाभावातून सशक्त भारताकडे बंधन बँकेच्या या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढ्यांसाठी शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीचे दार खुले झाले आहे. महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावणारी ही चळवळ देशातील सामाजिक परिवर्तनाचे नवे पर्व लिहित आहे.
आपला विश्वासू :
संतोष धर्माधिकारी
📞 मो. 77700 27505

No comments