अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्यतर्फे चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन, येथे मा.पोलिस निरीक्षक श्री. महे...
अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्यतर्फे चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन, येथे मा.पोलिस निरीक्षक श्री. महेश टाक यांना संपाचे निवेदन सादर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.०७/११/२०२५ शुक्रवार रोजी ग्रामिण पोलिस स्टेशन,चोपडा जि.जळगांव येथे मा.पोलिस निरीक्षक श्री.महेश निर्मला बाळासाहेब टाक यांना अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्यतर्फे दि.१२/११/२०२५ पासून ते दि.१४/११/२०२५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संप पुकारलेल्या बाबत निवेदन देण्यात आले हे निवेदन देण्यासाठी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रदेश उपाध्यक्ष (खान्देश विभाग) श्री.जगदीश तायडे, चोपडा तालुक्यातील संघटनेचे तालुकाध्यक्ष, श्री.भुषण सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष श्री.प्रशांत विसावे, तालुका सचिव श्री.कैलास सोनवणे, श्री.राहुल पाटील वर्डी, दिनेश बाविस्कर, श्री.दिपक गवळी, श्री.प्रशांत पाटील व चोपडा तालुक्यातील सर्व केंद्र संचालक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

No comments