वीज कंपन्यांनी सानुग्रह अनुदान रोखले; वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात… महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये ८६ हजारांच्या जवळपास नियमि...
वीज कंपन्यांनी सानुग्रह अनुदान रोखले; वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात…
महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये ८६ हजारांच्या जवळपास नियमित तर २० हजारांवर कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना केवळ १५ हजार ते १८ हजार मासिक वेतन आहे.
महावितरणच्या निर्णयावर कामगार संतापले; वीज कंपन्यांनी सानुग्रह अनुदान रोखले
नागपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नागपूर :- महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीने दिवाळीतील सानुग्रह अनुदान (बोनस) रोखल्याने यंदा वीज कर्मचाऱ्यांची त्या दिवाळी अंधारातच गेली. त्यामुळे वीज कामगारांमध्ये संताप आहे.महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये ८६ हजारांच्या जवळपास नियमित तर २० हजारांवर कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना केवळ १५ हजार ते १८ हजार मासिक वेतन आहे. २०२४-२५ साठी तिन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीत २०,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. महापारेषण आणि महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी १६ ऑक्टोबरला या प्रस्तावाला मंजुरीही दिली. परंतु, महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वाक्षरी केली नाही. मागील महिन्यात कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा शेवटचा हप्ता दिल्याचे आणि त्यामुळे कंपनीच्या खात्यात पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळे दिवाळीत तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही.

No comments