adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर ते शेगाव पायीवारीचे १८ ते २१ डिसेंबर पर्यंत आयोजन

 फैजपूर ते शेगाव पायीवारीचे १८ ते २१ डिसेंबर पर्यंत आयोजन   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथून सालाबाद प्रमाणे या ...

 फैजपूर ते शेगाव पायीवारीचे १८ ते २१ डिसेंबर पर्यंत आयोजन  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथून सालाबाद प्रमाणे या 8 व्या वर्षी सुद्धा जय गजानन गृप तर्फे फैजपूर ते शेगाव पायीवारी चे दि. 18 डिसेंबर 2025 गुरुवार ते 21 डिसेंबर 2025 रविवार ह्या चार दिवसापर्यंत पर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे.

 ह्या वारीचे ध्वजपूजन 18 डिसेंबर 2025 ला  पहाटे 5 वा. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, सतपंथ मंदिर संस्थान हे करतील. 118 किलोमीटर अंतर भाविक 4 दिवसात मुक्ताईनगर, मलकापूर, हे आंबोडा(नांदुरा) मुक्काम करून शेगाव येथे टाळ मृदूंग च्या गजरात शिस्तीने पोहचतील.गजानन महाराज शेगाव संस्थान  मार्फत वारकऱ्यांना महा वस्त्रदान केले जाते. वारीसाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ मधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉ अमित हिवराळे, सदगुरू डायबेटिक हॉस्पिटल फैजपूर. डॉ हर्षल पाटील, मुक्ताईनगर. आणि डॉ अमोल फिरके आरोग्यदीप हॉस्पिटल  मलकापूर हे असतात. तरी ज्या भाविकांना वारीला यायचे असेल त्यांनी 4 डिसेंबर 2025 पर्यंत आपले प्रवेश अर्ज आयोजक दीपक होले सर (वारी प्रमुख), दिनकर नारखेडे, योगीराज नारखेडे, गिरीश नेमाडे यांचे कडे जमा करावेत.असे वारी प्रमुख दीपक होले सर यांनी कळविले आहे.

No comments