adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. मीरा नरेंद्र शिंदे प्रमुख दावेदार

  प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. मीरा नरेंद्र शिंदे प्रमुख दावेदार  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेच्या ...

 प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. मीरा नरेंद्र शिंदे प्रमुख दावेदार 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 (क) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. मीरा नरेंद्र शिंदे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्या प्रभागात त्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.

सौ. मीरा शिंदे यांचे पती श्री. नरेंद्र शिंदे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असतात. सामान्य कुटुंबातून आलेले श्री. शिंदे यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर जनमानसात भक्कम स्थान निर्माण केले आहे. बोरवल गेट परिसरात तसेच प्रभागातील विविध भागात त्यांचा दांडगा संपर्क असून अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

स्थानिक शिवतीर्थ या ठिकाणी ते धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. विशेष म्हणजे गरीब मुलांचे वाढदिवस तेथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना ते स्वतःच्या खर्चाने दवाखान्यात उपचारासाठी मदत करतात.

गणपती उत्सव, नवरात्र, शिवजयंती यांसारख्या सणांमध्ये ते नेहमी पुढाकार घेतात. शांत, मनमिळावू स्वभाव आणि लोकांशी सततचा संवाद यामुळे त्यांचे जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. शिवाजीनगर किल्ला परिसर, धनगरवाडा, बोरवल गेट आणि साने गुरुजी शाळेजवळील परिसरात त्यांचा व पत्नीचा प्रभाव अधिक असून, प्रभाग क्रमांक 11 (क) मधील मतदारांमध्ये सौ. मीरा शिंदे यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments