फैजपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपाच्या सौ.दामिनी सराफ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या सुमैय्या बी शे. कुर्बान यांच्यात सरळ ...
फैजपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपाच्या सौ.दामिनी सराफ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या सुमैय्या बी शे. कुर्बान यांच्यात सरळ लढत
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपुर नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी माघारीच्या अंतिम दिवशी इच्छुक उमेदवारांची राजकीय घडामोडी पाहण्यास मिळाली नगराध्यक्षा पदाच्या आरक्षित महिला ८ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केले होते. त्या पैकी ६ अर्ज माघारी झाल्याने आता २ महिला उमेदवारी नगराध्यक्षा पदासाठी आमने-सामने लढत देत असल्याने मोठी चुरस ठरलेली आहेत.
आज महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या सौ.नीलिमा केतन किरंगे यांनी माघार घेतले त्या पाठोपाठ (एम. आय.एम) च्या उमेदवार यांनी सुद्धा उमेदवारी माघारी झाल्याने आता भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुमैय्या बी शे. कुर्बान समोरासमोर लढत आहे तर नगराध्यक्षा उमेदवार सुमैय्या बी शे. कुर्बान यांना माजी आ. शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडीला जाहीर रित्या पाठिंबा दिला आहेत तर आज माघारीच्या दिवशी ५ उमेदवार बिनविरोध झाले त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष अनवर अजगर खाटीक तसेच भाजपाचे सिद्धेश्वर वाघुळदे सौ. नीलिमा राजेश महाजन सागर हरिचंद्र होले तर माजी उपनगराध्यक्ष केतन डीगंबर किरंगे असे एकूण ५ उमेदवार बिनविरोध झाले आहे.

No comments