adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नववर्षाआधीच दारू माफियांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात मोठी कारवाई..तब्बल 30 लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपी पसार

 नववर्षाआधीच दारू माफियांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात मोठी कारवाई..तब्बल 30 लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपी पसार  सचिन मोकळं अहिल्यानगर...

 नववर्षाआधीच दारू माफियांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात मोठी कारवाई..तब्बल 30 लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपी पसार 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१९):-राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अहिल्यानगर-1 विभाग यांनी दि. 18 डिसेंबर 2025 रोजी प्राप्त खात्रीलायक बातमीच्या आधारे तारकपूर,अहिल्यानगर येथे स्टाफसह जाऊन सापळा रचला.सदर कारवाई दरम्यान महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन याची तपासणी केली असता वाहनामध्ये खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले.तपासणीमध्ये गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे एकूण 204 बॉक्स मिळून आले.या प्रकरणी वाहनामधील फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ)(ई),80,81, 83, 90 व 103 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कारवाईत जप्त 29 लाख 59 हजार 200/रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यवाहतुकीवर मोठा आघात बसला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

No comments