रस्त्यावर वाहन लावल्याचा वाद पेटला;लोखंडी कोयत्याने भाडेकरूवर जीवघेणा हल्ला.. गुन्हा दाखल! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकव...
रस्त्यावर वाहन लावल्याचा वाद पेटला;लोखंडी कोयत्याने भाडेकरूवर जीवघेणा हल्ला.. गुन्हा दाखल!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३):-अंबा कॉलनी भिस्तबाग चौक परिसरात वाहन रस्त्यावर उभे केल्याच्या किरकोळ कारणावरून निर्माण झालेला वाद एकदम गंभीर बनत गेला आणि अखेर एका व्यक्तीने भाडेकरूवर लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना १ डिसेंबर रोजी सकाळी घडली.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र मोहन तनपुरे (वय ३०, व्यवसाय–कपड्यांचे दुकान), रा. अंबा कॉलनी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.ते अंबा कॉलनी येथील बाळासाहेब बारस्कर यांच्या भाड्याच्या घरात राहतात.त्यांच्या घरासमोर राहणारा प्रिन्टोपॉल मुट्टत हा व्यक्ती नेहमीच घरमालक व भाडेकरूंना शिवीगाळ करीत असून परिसरात त्याच्यामुळे त्रासाचे वातावरण कायम असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.१ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता प्रिन्टोपॉल मुट्टत हा आपली मोटारसायकल चालवत असताना रस्त्यावरून घसरला.त्यानंतर त्याने पडण्याचे कारण रस्त्यावर उभ्या वाहनांना ठरवत घरमालक बाळासाहेब बारस्कर आणि इतर भाडेकरूंना शिवीगाळ सुरु केली.
वाद वाढू लागल्याने राजेंद्र तनपुरे यांनी घरमालकांना बोलावून घेतले.त्यानंतर बाळासाहेब बारस्कर,राहुल तनपुरे,हरिभाऊ धुमाळ या परिसरातील नागरिकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने समजून घेण्याऐवजी घरमालकांनाच धमकी दिली.
वाद चिघळल्यानंतर अचानक प्रिन्टोपॉल घरात धावून गेला आणि हातात लोखंडी कोयता घेऊन बाहेर आला.त्याने थेट राजेंद्र तनपुरे यांना लक्ष्य करत कोयता उगारला.हा वार त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ बसला.वार झाल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
घटनेनंतर घाबरलेला आरोपी प्रिन्टोपॉल मुट्टत घटनास्थळावरून पसार झाला.जखमीचा तातडीचा उपचार व पोलिसांत गुन्हा दाखल
जखमी राजेंद्र तनपुरे यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तत्काळ अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रिन्टोपॉल मुट्टत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाहन पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केल्याने परिसरातील शांततेला तडे जाऊन नागरिकांनी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments