adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे विद्यालय म्हसावद येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियान

 थेपडे विद्यालय म्हसावद येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियान   जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)        महिला व ब...

 थेपडे विद्यालय म्हसावद येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियान  


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

       महिला व बालविकास आयुक्तालय आणि मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून आयोजित  बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत आज रोजी विविध स्पर्धा(निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा) आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री जी डी बच्छाव सर तसेच दैनिक युवक आधारचे समाधान भाऊ पाटील उपस्थित होते. प्रथमतःबेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत11वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक कॉलनी म्हसावद येथे  रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत विद्यालयाचे प्राचार्य श्री जी डी बच्छाव सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.


*बेटी बचाव बेटी पढाव  मुलगी शिकली प्रगती झाली* हा संदेश या रॅलीतून देण्यात आला तसेच रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनी अतिशय सुंदर रांगोळ्या  या रांगोळ्यातून *वंशाचा दिवा कशाला हवा वंशाची पणती ही लावा* हा संदेश देण्यात आला त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर निबंध स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा ही घेण्यात आली. या अभियानासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अनमोल असे सहकार्य केले.

No comments