चोपड्यात वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ चे सेमी‑फायनल व फायनल आज २८ डिसेंबर २०२५ रोजी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड्यात ...
चोपड्यात वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ चे सेमी‑फायनल व फायनल आज २८ डिसेंबर २०२५ रोजी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड्यात सुरू असलेल्या पाच दिवसीय वीर गुजर क्रिकेट लीग पर्व 2 सेमी फायनल व फायनल उद्या आयोजित करण्यात आले आहेत. सेमी‑फायनल दुपारी खेळवले जाणार असून फायनल रात्री होनार आहे एक वीर गुजर क्रिकेट लीग पाहण्यासाठी सर्व जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना चोपडा, गोरगावले रोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ हे पाच दिवसीय क्रिकेट लीग मॅच होते .२४ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाले आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी शेवटच्या दिनी पोहोचला आहे. चोपडा येथे आयोजित या लीगमध्ये राजस्थान, गुजरात, मुंबई व इतर जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले आहेत. आयोजकांनी बाहेरून येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था समर्थ पार्क येथे केली आहे. २८ डिसेंबर रोजी शेवटचा दिन असल्याने सर्व क्रिकेट प्रेमींना चोपडा येथे उपस्थित राहून समापनाचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीर गुजर क्रिकेट लीग मध्ये विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज चौथ्या दिवशी सुरू असलेल्या सामन्यात विजयी ठरलेल्या वैदिक ऋषी कॅम्पुटर संघाचे खेळाडू नचिकेत चौधरी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार निचिकेत चौधरी यांना पोलीस किरण पाटील व विनायक पाटील यांच्या हातून देण्यात आला.
वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ मध्ये विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूंना गोलंदाजी व फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना योग्य ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. या लीगमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. आज २८ डिसेंबरला होणाऱ्या सेमी‑फायनल व फायनल पाहण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमींना गोरगावले रोडवरील मैदानावर आवर्जून उपस्थित राहावे,आयोजकांतर्फे सर्व क्रिकेटर प्रेमींना चोपड्यात वीर गुजर क्रिकेट लीग पर्व दोन पाहण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments