adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जिल्ह्याचा डंका; खेळाडूंकडून प्रशिक्षकांना पदकांची 'बर्थडे भेट

 राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जिल्ह्याचा डंका; खेळाडूंकडून प्रशिक्षकांना पदकांची 'बर्थडे भेट  अमोल बावस्कार बुलढाणा ​ (संपादक -:- हेमक...

 राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जिल्ह्याचा डंका; खेळाडूंकडून प्रशिक्षकांना पदकांची 'बर्थडे भेट 


अमोल बावस्कार बुलढाणा ​

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देवास मध्यप्रदेश येथे संपन्न झालेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत बुलढाणा जिल्ह्याच्या खेळाडूंनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या यशस्वी खेळाडूंनी आपली पदके सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव तथा क्रीडा संघटक व  क्रीडा मार्गदर्शक विजय पळसकर यांना त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त भेट देऊन गुरुदक्षिणा अर्पण केली.

स्पर्धेचा आढावा:- मध्यप्रदेशातील देवास येथे १० ते १४ डिसेंबर दरम्यान ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र संघातून बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ४ खेळाडूंनी एकूण ५ पदकांवर आपले नाव कोरले. १६ डिसेंबर रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर विजय पळसकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खेळाडूंनी आपली पदके सरांना सुपूर्द करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

यशवंत खेळाडू:

स्पर्श अमोल तायडे: सुवर्ण पदक (Gold Medal),  ​सोनल गणेश खर्चे: वैयक्तिक रौप्य आणि सांघिक रौप्य पदक (Silver Medals),​श्रावणी गजानन जोगदंड: रौप्य पदक (Silver Medal)​, सार्थक गजानन: कांस्य पदक (Bronze Medal), आर्यन राहुल चोपडे: सहभाग, आर्या कल्पक लढा: सहभाग, भक्ती संदीप क्षीरसागर : सहभाग, ​अभिषेक मानकर व कु भक्ती साळुंके : (महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून मोलाची भूमिका) उपस्थित मान्यवर:- या सोहळ्याला ज्येष्ठ मार्गदर्शक शेषराव सोनोने, मलकापूर आरपीएफ पोलीस इन्स्पेक्टर जसपाल राणा, रमेशभाऊ उमाळकर ज्येष्ठ पत्रकार तसेच राजुभाऊ पाटील माजी नगरसेवक तथा क्रीडामार्गदर्शक राजेश्वर खंगार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक जाधव यांनी मानले. विजय पळसकर यांनी खेळाडूंच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*

No comments