उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी रामचंद्र येशी यांची निवड तर जिल्हाध्यक्ष बि. के. सूर्यवंशी तर धुळे जिल्हा सचिवपदी आर एन पवार सर शि...
उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी रामचंद्र येशी यांची निवड तर जिल्हाध्यक्ष बि. के. सूर्यवंशी तर धुळे जिल्हा सचिवपदी आर एन पवार सर
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र नाभिक महामंडळात खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांना न्याय आदरणीय कल्याणरावजी दळे साहेबांच्या निर्णायक नेतृत्वातून धुळे जिल्ह्याला नवे बळ
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, समन्वय आणि सर्वसमावेशकतेचा आदर्श निर्माण करत खालच्या ग्राउंड लेव्हलवरील पदाधिकाऱ्यांना न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय आज धुळे जिल्ह्यात घेण्यात आला. महामंडळाचे हृदयसम्राट, आदरणीय कल्याणरावजी दळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण बदल घडून आला.आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता, धुळे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.महामंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विचार-विनिमयातून, सर्वानुमते निर्णय घेऊन जिल्हाध्यक्षपदात बदल करण्यात आला. त्यानुसार बी. के. नाना सूर्यवंशी यांची धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. याचबरोबर, उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी – रामचंद्र येशी, धुळे जिल्हा सचिवपदी – आर. एन. पवार सर, धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी – भीमराव वारुळे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.बी. के. सूर्यवंशी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने धुळे जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या काळात महामंडळासाठी सुवर्णकाळ सुरू होईल, यात तीळमात्र शंका नाही, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.या ऐतिहासिक निर्णयानंतर नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बहुसंख्य समाजबांधवांच्या साक्षीने पदनियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदरणीय कल्याणरावजी दळे साहेबांनी नवनियुक्त
पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.धुळे जिल्ह्याला दिलेल्या या न्याय्य निर्णयामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अधिक संघटित, सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर
किशोर भाऊ सूर्यवंशी कल्याणराव दळे साहेब पृथ्वीराज सोनवणे रवींद्र भडगाव सुनील बोरसे मा हिरालाजी ठाकरे मा नरेंद्र खोंडे भगवान चित्ते अॅड किशोर जाधव बापु दंगल सैदाणे आर एन पवार सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जेस्ठ नागरिक भवन या ठिकाणी कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रम यशस्वी साठी महामंडाळचे प्रसिद्धी प्रमुख विशाल चित्ते प्रविन सैंदाणे धनराज पगारे दत्तू बापू सैंदाणे गणेश सूर्यवंशी लक्ष्मण बोरसे पपू येशी यांनी अतोनात मेहनत गेऊन कार्यक्रम यशस्वी रितीने संपन्न केला



No comments