शिवणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपींच्या चिंचणी-वागी पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! (सांगली जिल्हा)...
शिवणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपींच्या चिंचणी-वागी पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
(सांगली जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपींच्या चिंचणी-वांगी पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून लतिका कृष्णात पवार (वय 44) फिर्यादी यांच्या दाखल असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चिंचणी-वांगी पोलिसांनी सदर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीसाठी साठी तपासाची सूत्रे चांगलीच हलवली होती. चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. राहुल घुगे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील तपासी पथकाला सदर आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार विक्रम कुंभार विनय सावळगे यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून सदर आरोपींच्या अंबक ता. कडेगांव जिल्हा सांगली) येथे जावुन शोध घेतला असता सदर आरोपी आंबक फाटा येथे मिळून आला सदर आरोपींच्या ताब्यातील चोरीस गेलेले 30,000 रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले. ताब्यात असलेल्या आरोपींने अखेर चोरीची कबुली पोलिसांना दिली. कादर शरीफ काझी (वय 20) रा. अंबक ता. कडेगाव जि. सांगली ) असे आरोपीचे नाव आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार पोलीस हवालदार विक्रम कुंभार विनय सावळगे संपत जाधव गणेश तांदळे योगेश माळी शिवाजी हिप्परकर आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला. चिंचणी-वांगी पोलीस ठाणेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

No comments