adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !...

 महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !...  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्म...

 महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !... 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

         याप्रसंगी धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.कांचन पाटील, विजय कंखरे ( फार्मासिस्ट ), संगीता बारेला ( नर्स ) यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची संवाद साधत विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जे एस पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे,एम बी मोरे, एच डी माळी, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी यासह शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

No comments