adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश विद्यालय व जु. कॉलेजला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पारितोषिक!

 प्रकाश विद्यालय व जु. कॉलेजला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पारितोषिक!  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 प्रकाश विद्यालय व जु. कॉलेजला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पारितोषिक! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये प्रकाश विद्यालय व जु. कॉलेज मोठे वाघोदे बुद्रुक  येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांनी तरंगते नदी स्वच्छता यंत्र हे उपकरण सादर केले होते . या उपकरणाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता नववी ते बारावी या गटातून दुसरे पारितोषिक मिळाले. हे उपकरण तयार करण्यासाठी विद्यालयातील कु . दर्शिका विलास महाजन कु. मनस्वी वैभव चौधरी कु.साक्षी राहुल पाटील कु.प्राजक्ता विलास तायडे या विद्यार्थिनी नी परिश्रम घेतले प्रदर्शनात द्वितीय पारितोषिक मिळविल्याबद्दल प्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस महाजन पर्यवेक्षक राजेश बडगुजर तसेच शिक्षक वृंद संस्थेचे अध्यक्ष पी टी महाजन चेअरमन डि.के महाजन सचिव किशोर जगन्नाथ पाटील विजयकुमार बाजीराव पाटील श्रावण सिताराम महाजन आदींसह सर्व संचालक मंडळातर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक केले

No comments