यावल ते भुसावळ मुख्य रस्त्याची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ? आमदार अमोल भाऊ जावळे यांनी लक्ष देण्याची मागणी यावल श.प...
यावल ते भुसावळ मुख्य रस्त्याची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ?
आमदार अमोल भाऊ जावळे यांनी लक्ष देण्याची मागणी
यावल श.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल ते भुसावळ मुख्य रस्त्याचे बारा वाजले असल्याचे चित्र दिसत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत असल्याचे बोलले जात असून यावल ते भुसावळ पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे या रस्त्यावरील निमगाव, अंजाळे या गावाजवळ ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत तसेच निमगाव जवळील पुलावरील कठडे तुटण्याच्या परिस्थित दिसुन येत आहे. तसेच नवीन कठडे बांधण्यात यावे. रस्त्याची बिकट परिस्थित झाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास मोठी कसरत करावी लागत आहे तसेच काही वाहन खड़े चुकवण्याच्या प्रयत्नाने छोटेमोठे अपघाताला समोरे जावे लागत आहे. तरी याकडे लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात यावल ते भुसावळ रस्त्याची स्वतः हा लक्ष देऊन पाहणी करावी. अशी मागणीही वाहनधारकांन कडून होत आहे.
प्रतिक्रिया:- नितीन सोनार शिवसेना शिंदे गट उपजिल्हा संघटक,रा. यावल
आंदोलनाचा इशारा
यावल ते भुसावळ मार्गावरील, जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवावेत हा मार्ग खड्डेमय झाला आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी आमदार अमोल भाऊ जावळे यांनाही कळविले आहे तसेच सा. बा. विभाग यांना ही निवेदन दिले आहे. खड्डे बुजवण्यात आले नाहीतर आंदोलन करण्यात येईल.


No comments