शिक्षणासोबत संवेदनशीलतेचा संदेश : खाचणे शाळेत स्वेटर वाटप कार्यक्रम, रोटरी क्लब ऑफ चोपडा यांचा उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
शिक्षणासोबत संवेदनशीलतेचा संदेश : खाचणे शाळेत स्वेटर वाटप कार्यक्रम, रोटरी क्लब ऑफ चोपडा यांचा उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खाचणे येथे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने स्वेटर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नितीन सोनवणे यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. आशिष जैस्वाल यांनी आपल्या मनोगतातून समाजातील गरजू घटकांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विषद करत विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर व आत्मविश्वासपूर्ण सूत्रसंचालन इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनी मानवी व वैभवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. सतीश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन श्री. सुनील पाटील व श्री. गणेश महाजन यांनी उत्तमरीत्या पार पाडले. स्वेटर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

No comments