adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त स्मिता म्हसाय यांचे अभिवादन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त स्मिता म्हसाय यांचे अभिवादन  अमोल बावस्कार बुलढाणा  (संपादक -...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त स्मिता म्हसाय यांचे अभिवादन 


अमोल बावस्कार बुलढाणा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, निकोप आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी सर्व समाजघटकांचा सखोल विचार करून भारतीय राज्यघटना निर्माण केली. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वाला कायदेशीर परिपूर्णता आणि समानतेचा अधिकार मिळाला,”

— असे प्रतिपादन बुलढाणा जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त स्मिता म्हसाय यांनी बाबासाहेबांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या—

“बुलढाणा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजातील प्रत्येक स्तरासाठी न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक काम करण्याचे मी वचन देते. बाबासाहेबांचे विचार हे माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत. ‘We are Indians, first, last and always’ हा त्यांचा संदेश आजही माझ्या कार्याचा मार्गदर्शक दीप आहे.” महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मिता म्हसाय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत—

“जय हिंद” अशी भावना व्यक्त केली.

No comments