adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुंबई स्थित न्हावी वासियांचे स्नेहसंमेलन उत्साहात

  मुंबई स्थित न्हावी वासियांचे स्नेहसंमेलन उत्साहात  इदू पिंजारी फैजपूर -  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कोपरगाव  येथे म्हाळसा देवी मंदिर, डो...

 मुंबई स्थित न्हावी वासियांचे स्नेहसंमेलन उत्साहात 


इदू पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कोपरगाव  येथे म्हाळसा देवी मंदिर, डोंबिवली पश्चिमेला श्रीमंत न्हावी वासीय  लेवा मंडळ, मुंबई परिसर यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.समाजातील सर्व परिसरातील मुंबईस्थित न्हावी वासिय ग्रामस्थ एकत्र येऊन निरनिराळ्या प्रकारचे खेळ, महिलांसाठी तिन पैठणीचा लकी ड्रॉ, हळदी कुंकू समारंभ, प्रत्येक उपस्थित महिलांना वाण देण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ.ममता पाटील, मा. सभापती यांच्या स्विय सहायक,( रवींद्र साठे,राज्यमंत्री पद दर्जा)  खादी व ग्रामोद्योग मंडळ. तसेच डाॅ.सौ.पौर्णिमा हर्षल ढाके आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिका उपस्थित होते. 

सौ.ममता पाटील यांनी आपल्या भाषणातून न्हावी गावाची ओळख कै. दादासाहेब जे टी महाजन (माजी गृह राज्यमंत्री) यांनी महाराष्ट्र राज्याला करून दिली असे सांगून त्या कार्यरत असलेल्या खादी व ग्रामोद्योग विभागातील स्वयंरोजगार निर्मितीच्या संधी याबाबत उपस्थितांना  मार्गदर्शन केले.

        डॉ.सौ.पौर्णिमा ढाके यांनी वातावरणीय बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम काय असतो आणि त्यावर प्रतिबंधात्मक इलाज कोणते करायला पाहिजे. याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना  दिली.

या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी समाज बांधवांना मोलाचे शब्द ऐकवून महिला सक्षमीकरणा साठी यांचा उपयोग नक्की होईल अशी आशा महिलांमध्ये निर्माण केली.

गेल्या वर्षीचे अन्नदाता  अरुण चोपडे यांच्या सौभाग्यवती सौ. हेमांगिनी चोपडे  सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

सध्याच्या कार्यकारिणीने अथक प्रयत्न करून कार्यक्रम सुंदर, नियोजन बद्ध,पार पाडला.यामधे प्रमुख सल्लागार विश्वनाथ पाटील, युवराज वाघुळदे,  हेमराज बेंडाळे, लिलाधर फिरके,यशवंत पाटील,सुनील महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

व्यवस्थापन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते भुषण कोलते, पवन महाजन, मोहन चौधरी, प्रमोद चौधरी,यशवंत लढे, युवराज फिरके, योगेश बेंडाळे, हेमंत फिरके तसेच महिला व्यवस्थापन तसेच काऊंटर वरील सर्व कामकाज सौ.दिपाली  जंगले, सौ.उर्मिला चौधरी, सौ. हेमलता चौधरी,सौ.मनिषा पाटील, सौ.सुरेखा वाघुळदे यांनी  सांभाळले. सौ.मनिषा बेंडाळे यांनी आपले सुत्रसंचालन केले.लहानां पासून थोर मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व कार्यक्रम आपल्या घरचाच आहे याची प्रचिती आली. दहावी, बारावी यातील गुणवंतांचा सत्कार समारंभ, गोल्डन आणि सिल्व्हर मेडल्स, पुष्प देऊन करण्यात आला.

एकदिवसीय सहलीसारखा आनंद सर्वांनी घेतला.

सर्व खान्देशी जनतेचे आवडते पक्वान्न वरण,बट्टी, वांग्याची भाजी,भात,गुळ, आमसूल कढी यावर सर्वांनी मनमुराद खाण्याचा आनंद लुटला. पुढील वर्षी तिनं जणांनी अन्नदाता म्हणून नावे दिलेली आहेत त्यांचे आभार मानले. याव्यतिरिक्त बऱ्याच ग्रामस्थांनी काही ना काही आपलाच कार्यक्रम समजून मोलाची मदत आणि सहकार्य केले आहे. अशा सर्व गावाच्या वातावरणाचा उपभोग दरवर्षी या ठिकाणी सादर होत राहिल.म्हाळसा देवी मंदिर परिसरातच पुढेही यापेक्षा सुंदर नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन पुढील वर्षी भेटण्यासाठी तसेच वर्षभरात काही ना काही अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प सोडला.

No comments