विराट मल्टीपर्पज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गाय...
विराट मल्टीपर्पज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव येथील दिव्यांगांकरीता कार्यरत असलेल्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दि. १४ डिसेंबर २५ रोजी सकाळी १० वाजता खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील पत्रकार भवन येथे विविध उपक्रम ज्यामध्ये दिव्यांग उपयुक्त साधने नोंदणी, आरोग्य, कौशल्य रोजगार, शासकीय शिक्षण व शासकीय कार्यालयातील अडचणी विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते कार्य करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आपल्या कार्य कुशलतेतून आपले नाव उंचविणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. आयुष्यमान कार्ड, (आभा कार्ड) वैश्विक ओळखपत्र, बुडीआयडी कार्ड, ई श्रम कार्ड, संजय गांधी निराधार योजना फाईल आदीची या ठिकाणी निशुल्क नोंदणी व वितरण करण्यात येणार आहे जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments