adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नगर शहरात धक्कादायक घटना रस्त्यावरून बाजूला व्हा म्हणून सांगितल्यामुळे दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला

  नगर शहरात धक्कादायक घटना रस्त्यावरून बाजूला व्हा म्हणून सांगितल्यामुळे दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमक...

  नगर शहरात धक्कादायक घटना रस्त्यावरून बाजूला व्हा म्हणून सांगितल्यामुळे दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- शहरात वाहतूक सुकर करण्यासाठी नेहमीप्रमाणे गस्त घालत असलेल्या तोफखाना पोलीस गुन्हे शोध पथकातील दोन पोलिस अंमलदारांना काही नागरिकांनी अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यामध्ये पोलीस अंमलदार अविनाश बर्डे, बाळासाहेब भापसे हे गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कल्याण रोडवर एका काही नागरिक आडवा तिडवा उभे राहून वाहतूक अडवत होते.त्यांना बाजूला व्हा, रस्ता मोकळा करा असे सांगण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी तेथे गेले असता परिस्थिती अचानक बिघडली. रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तींनी पोलिसांशी वाद घालत त्यांच्यावर हात उगारल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते.घटने दरम्यान दोन्ही पोलिसांना जबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.काही क्षणांपुरती का होईना,पण परिस्थिती पूर्णपणे तणावग्रस्त झाल्याचे दिसून आले. परिसरातील नागरिक व वाहनचालकांनीही भीतीपोटी पळापळ केल्याचे व्हिडिओमधील दृश्य भयावहता अधोरेखित करते.व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पोलिसांना हटकल्याप्रमाणे बाजूला ढकलताना दिसतो, तर इतर काहीजण परिस्थिती अधिक चिघळवत असल्याचे जाणवते. या हल्ल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.घटनेनंतर पोलिस प्रशासनाकडून गुन्हा नोंदवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

No comments