वर्धा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी तात्काळ स्वीकारला पदभार, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूरला बदली ! (वर्ध...
वर्धा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी तात्काळ स्वीकारला पदभार, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूरला बदली !
(वर्धा जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागांने सध्या पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू केला असून यामध्ये सोमवारी रात्री उशिरा दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून. यामध्ये सौरभ कुमार अग्रवाल आणि नीलभ रोहन यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नीलभ रोहन हिंगोलीत तर सौरभकुमार अग्रवाल वर्ध्यात पोलीस अधीक्षक म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आज रोजी सकाळी 11वाजता वर्धा पोलीस मुख्यालयात सौरभ कुमार अग्रवाल यांनी मावळते पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आत्तापर्यंत वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून होते. तर आता त्यांना नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आले आहे. तर नव्याने पदभार स्वीकारलेले आयपीएस अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल हे कायदा व सुव्यवस्था अभावीत राखणे गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या दिशेने त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय ठरेल अशी अपेक्षा आता वर्धाकरांकडून व्यक्त होत आहे. सौरभ कुमार अग्रवाल हे एक कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय आणि जनतेशी संवाद साधणारे अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे.

No comments