बाभुळगाव येथे परमपूज्य संत माणिक स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात विकास पाटील धरणगाव (संप...
बाभुळगाव येथे परमपूज्य संत माणिक स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील बाभूळगाव येथे सालावादाप्रमाणे याही वर्षी संत श्री माणिक स्वामी महाराज व संत श्री दौलत स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी च्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन ही करण्यात आलेले असते. मिती पौष शु. दिनांक ०२/०१/२०२६ शुक्रवार ते दिनांक ०९/०१/२०२६ शुक्रवार पर्यंत बाभुळगाव गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. संपूर्ण बाबुळगाव चे आराध्य दैवत असलेली संत श्री माणिक स्वामी महाराज व संत श्री दौलत स्वामी महाराज यांचे बाभुळगाव येथे एक भव्य मंदिर असून येथे दरवर्षी सप्ताहाचे आयोजन हे केलेले असते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
रात्रीची कीर्तन सेवा 08:30 ते 10.30 पर्यंत दिनांक ०२/०१/२०२६ वार शुक्रवार रोजी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. श्री कृष्णा महाराज सोनवद. 03/01/2026 शनिवार हरिभक्त परायण स्नेहलताई सामनेर, 04/01/2026 रविवार रोजी हरिभक्त परायण श्री. स्वप्निल महाराज गिरडकर, 05/01/2026 सोमवार रोजी हरिभक्त परायण श्री लीलाधर महाराज मोंढाळेकर, 06/01/2026 रोजी ह भ प श्री दिलीप महाराज बिडकर, 07/01/2026 रोजी ह भ प श्री शुभम महाराज मंदाने, 08/01/2026 रोजी ह भ प श्री प्रल्हाद महाराज कळमसरे, 09/01/2026 रोजी काल्याचे कीर्तनाची सेवा ह.भ. प. श्री गजानन महाराज वरसाडेकर यांच्या अमृतवाणीतून काल्याचे किर्तन ची सांगता करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 08/01/2026 रोजी दुपारी 3 वाजता पालखी सोहळ्याच्या आयोजने करण्यात आलेले आहे. बाभूळगावातील होत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला परिसरातील भाविक भक्तांनी कीर्तन रुपी सेवेच्या जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. दिनांक 9 रोजी काल्याचे किर्तन झाल्यावर परमपूज्य संत श्री माणिक स्वामी महाराज व परमपूज्य श्री दौलत स्वामी महाराज यांच्या महाआरती ने सप्ताहाची सांगता करण्यात येईल व परिसरातून आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाआरतीच्या व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाभुळगाव ग्रामस्थांनी केलेले आहे केलेले आहे.

No comments