adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांची कत्तलखान्यावर पहाटे धाड गावठी जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणारे पकडले

 कोतवाली पोलिसांची कत्तलखान्यावर पहाटे धाड गावठी जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणारे पकडले  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गाय...

 कोतवाली पोलिसांची कत्तलखान्यावर पहाटे धाड गावठी जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणारे पकडले 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  शहरातील बाबा बंगाली,जीपीओ रोड,जुने कलेक्टर ऑफिस समोर येथील पत्र्याच्या शेडमध्ये गावठी जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केल्याचा गंभीर प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे.गुप्त बातमीच्या आधारे पहाटे ५ वाजता करण्यात आलेल्या कारवाईत अस्कर हसन कुरेशी (वय ५०), मुझक्कीर मुस्ताक कुरेशी (वय ३६) व हसनैन सादिक कुरेशी (वय २५), रा. बेपारी मोहल्ला, सुमेर गल्ली, शेंडीगेट, अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाई दरम्यान घटनास्थळी २ जिवंत गावठी जनावरे, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व अंदाजे ५०० किलो गोमांस असा एकूण १,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(क), ९, ९(अ) व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,पोलीस अंमलदार दौंड, विशाल दळवी,विनोद बोरगे, अविनाश वाघचौरे,महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अभय कदम,अमोल गाडे, सुरज कदम,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे,अतुल काजळे,राम हंडाळ,अतुल लाटे,दक्षिण मोबाईल सेलचे कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.

No comments