adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

 पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.   भरत कोळी यावल (संपादक...

 पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.  


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

                  यावल दिनांक-22-1- 2026 रोजी विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एम. के .पाटील सर यांनी भूषवले प्रमुख मान्यवर म्हणून उपप्राचार्य श्री.ए .एस .इंगळे सर,पर्यवेक्षक श्री . व्ही.ए .काटकर सर पर्यवेक्षक श्री .व्ही.टी . नन्नवरे सर ज्येष्ठ शिक्षक श्री. डी.एस फेगडे सर , श्री.पी.एन .सोनवणे सर व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व प्राध्यापक  बंधू भगिनी व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी आदरणीय प्रा. श्री. एच.डी.पाटील सर यांनी शिक्षा सूची चे वाचन केले व कॉपीमुक्त परीक्षा ची प्रतिज्ञा घेतली त्यानंतर प्रा.डी.डी.पाटील सर यांनी उत्तर पत्रिका वरील सूचना वाचन केले .कु. दिपाली सुरवाडे, कु.चेतना फलक , कु. रोहिणी ठोसरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर विद्यालयाचे  आदरणीय प्रा. श्री.अनिल सोनवणे  सर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असं मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री.एम.के .पाटील सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी डी पाटील सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. श्रीम. यु .डी .पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उच्च माध्यमिक विभागाचे  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments