adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

सार्वजनिक विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा  अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) – (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद ता. चोपडा य...

सार्वजनिक विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा 


अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) –

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद ता. चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे संचालक हरिष पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईडचा ध्वज सुटकार येथील कु. पूनम सोनवणे या विद्यार्थिनीच्या हस्ते फडकविण्यात आला.
यानंतर स्काऊट व गाईडच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पथसंचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच आबासो रामराव गुलाबराव देशमुख पूर्व प्राथमिक, सार्वजनिक खाजगी प्राथमिक व सार्वजनिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत व नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी अडावद परिसर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, उपाध्यक्ष रतिलाल महाजन, सहसचिव मिनाबाई देशमुख, संचालक मनोजकुमार देशमुख, रामकृष्ण पाटील, मधुकर देशमुख, प्रमोद देशमुख, सार्वजनिक खाजगी शाळेचे चेअरमन नामदेव बाबुराव पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापक जी. व्ही. पाटील तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व कवायत संचलन सचिन पाटील यांनी केले, तर ध्वज संचलनाची जबाबदारी नितीन महाजन यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments