पुण्यातील ऑल इंडिया कला प्रदर्शनात चोपड्याच्या चित्रकार अनिलराज पाटील यांची दोन चित्रे निवडली चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
पुण्यातील ऑल इंडिया कला प्रदर्शनात चोपड्याच्या चित्रकार अनिलराज पाटील यांची दोन चित्रे निवडली
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहराच्या कला क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली असून, येथील प्रसिद्ध चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या दोन चित्रांची पुणे येथील ऑल इंडिया लोकमान्य टिळक अँड बॅरिस्टर वि. वि. ओक स्मृति आर्ट एक्झिबिशन मध्ये निवड करण्यात आली आहे. हे भव्य कला प्रदर्शन १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत कला रसिकांसाठी खुले राहणार आहे. या ऑल इंडिया स्तरावरील कला प्रदर्शनात देशभरातील नामवंत व गुणवान चित्रकारांची चित्रे सहभागी होत असून, यामध्ये विद्यार्थी विभाग, कलाकार विभाग आणि डिजिटल विभाग अशा विविध विभागांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात निवड झालेल्या अनिलराज पाटील यांच्या चित्रांपैकी पहिले चित्र हे कलेची देवता श्री गणराय यांचे असून, ते पेन-इंक या माध्यमातून अत्यंत वेगळ्या व आकर्षक शैलीत साकारण्यात आले आहे. दुसरे चित्र हे पिंपळाच्या पानाचा प्रवास दर्शवणारे असून, पानाच्या सुरुवातीपासून ते पूर्णपणे पिकेपर्यंतचा टप्पा कलात्मक पद्धतीने रेखाटण्यात आला आहे. या चित्रामध्ये वरच्या बाजूस एक पक्षीही दर्शवण्यात आला असून, हे चित्र देखील पेनच्या साह्याने साकारलेले आहे. या दोन्ही चित्रांची ऑल इंडिया स्तरावरील प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत असून, चोपडा शहराच्या कला क्षेत्राचा नावलौकिक वाढवणारी ही निवड ठरत आहे.

No comments