adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोंदवाडे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

 दोंदवाडे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दोंदव...

 दोंदवाडे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दोंदवाडे येथील जिल्हा परिषद शाळा दोंदवाडे येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दोंदवाडे येथील माजी सैनिक मा. श्री. बालू सीताराम पाटील तसेच त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या सौ. आशाबाई बालू पाटील यांच्या हस्ते शालेय व अंगणवाडीतील मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत देशभक्ती, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी माजी सैनिक बालू पाटील व सौ. आशाबाई पाटील यांचे विशेष कौतुक केले. 


No comments