लासुर माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता. चोपडा येथील म...
लासुर माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर ता. चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा चित्रकला परीक्षेत सलग तीन वर्षापासून शंभर टक्के निकाल लागत आहे .या 2025 26 या शैक्षणिक वर्षात विद्यालयातर्फे चित्रकला परीक्षेच्या एलिमेंट्री परीक्षेत एकूण 19 विद्यार्थी बसले होते .त्यात ए ग्रेडचे सात, बी ग्रेडचे नऊ व सी ग्रेडचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण सोळा विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ए ग्रेडचा एक, बी ग्रेड चे आठ ,सी ग्रेडचे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जी एस सपकाळे सर व पी डी शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील, उपाध्यक्ष सुरेशचंद्र सुराणा, सचिव विक्रम रामदास माळी सर्व संचालक,मुख्याध्यापक आर एस पाटील सर ,उपमुख्याध्यापक आर एल बाविस्कर सर ,पर्यवेक्षक एस जी पाटील सर तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी केले आहे

No comments