सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पत्रकार प्रकाश कुलथे यांना दर्पण पुरस्कार प्रदान पत्रकार प्रकाश कुलथे यांना आचार्य बाळशास्त्री जांभे...
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पत्रकार प्रकाश कुलथे यांना दर्पण पुरस्कार प्रदान 
पत्रकार प्रकाश कुलथे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. ना.राम शिंदे व इतर मान्यवर.
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक -;- हेमकांत गायकवाड)
येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मगाव असलेल्या पोंभुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील स्मारक म्हणून उभारलेल्या दर्पण सभागृहात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, माजी आमदार रमेश जठार, मुंबई आकाशवाणीचे सहाय्यक केंद्र संचालक जयेंद्र भाटकर उपस्थित होते.
समारंभात बोलताना प्रा. ना. राम शिंदे यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावताना पत्रकारांनी समाजाभिमुख निर्भीड व मूल्याधिष्ठित पत्रकारिता जपली पाहिजे असे मत व्यक्त करत प्रकाश कुलथे यांनी दीर्घकाळ केलेल्या निष्ठावान व सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आजच्या वेगवान आणि बदलत्या माध्यम क्षेत्रातही पत्रकारिता आपले अस्तित्व टिकवून आहे. याचे श्रेय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या धोरणांना जाते बाळशास्त्रींनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दिला जाणारा दर्पण पुरस्कार हा बाळशास्त्रींच्या नावाने दिला जातो म्हणूनच तो पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान आहे असे म्हणाले.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म गावातील स्मारक प्रकल्पासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून निश्चितपणे निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देत ग्रामपंचायत व पत्रकार कल्याण निधीने या संदर्भात तातडीने अहवाल सादर करावा असेही त्यांनी नमूद केले.
समारंभाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, पोभूंले हे गाव महाराष्ट्रातील पत्रकारांची पंढरी व्हावी या भावनेतून हे स्मारक उभारले आहे.,आम्ही श्रद्धेने जांभेकरांच्या कार्याचा जागर करत आहोत बाळशास्त्रींची विद्वत्ता पत्रकारिता आणि संशोधन क्षेत्रातील त्यांचे महान कार्य आजही मार्गदर्शक आहे. यावेळी जयेंद्र भटकर यांनी रवींद्र बेडकीहाळ लिखित बाळशास्त्रीचे श्रीखंडात्मक चरित्र विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्याला भेट देऊन त्यांचे कार्य राज्यभर पोहोचवावे अशी विनंती सभापतींना केली.
यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तुत्वाचा एक शोध या त्रीखंडात्मक चरित्राचे लोकार्पण पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले या सोहळ्यास जिल्ह्यातील राज्यभरातील पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments