adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

 जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हिंदुहृदयसम्...

 जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती यावल शहरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी समस्त शिवसैनिक, नागरिक तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जयंतीनिमित्त शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल व तारकेश्वर विद्यामंदिर येथे लहान विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सदर उपक्रम उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते पार पडला.

सायंकाळी पाच वाजता फैजपूर रोड येथील श्री मनुदेवी माता मंदिर येथून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली वाजत-गाजत शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत श्री रेणुका माता मंदिर येथे समारोप करण्यात आला.


सालाबादप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी शिवसेनेतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात येत असे यावेळेस सुद्धा श्री रेणुका माता मंदिरात नगरसेविका वैशालीताई बारी व निलेश बारी यांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली.

यानंतर भुसावळ रोड येथील एम.के. फार्म हाऊस येथे स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ शहरातील शेकडो शिवसैनिक, नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

या वेळी यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद बापू कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगरसेवक तथा गटनेते सागर कुमार चौधरी, शिक्षण सभापती नगरसेवक पराग सराफ, उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कचरे, नगरसेविका वैशालीताई बारी  शिवसेनेचे ज्येष्ठ विभागप्रमुख पप्पूभाई जोशी, योगेश चौधरी, राजू शेख, विजय पंडित, शहर उपप्रमुख संतोषभाई खर्चे, कार्यक्रमाचे आयोजक युवा कार्यकर्ते गौरव जोशी, मयूर खर्चे, सारंग बेहेडे, माजी तालुकाप्रमुख कडून नाना पाटील,  सागर देवांग अजहर खाटीक, सुरेश कुंभार, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, मास्टर भासा, प्रकाश पारधे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments