adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री शिवाजी आ.प्रा.जि.प. केंद्र शाळा हातेड येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

श्री शिवाजी आ.प्रा.जि.प. केंद्र शाळा हातेड येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जि. प. केंद्र शाळ...

श्री शिवाजी आ.प्रा.जि.प. केंद्र शाळा हातेड येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जि. प. केंद्र शाळा हातेड येथे शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी शिक्षण परिषद यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्र.प्रमुख. श्री पुरुषोत्तम सोनवणे सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल पाटील यांनी प्रभावीपणे केले.  परिषदेत निपुण चाचणी विषयावर श्री. सनेर सर व श्री. भोईसर सर यांनी सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले. तसेच श्री. मधुकर पाटील व श्री. बाविस्कर सर यांनी संबंधित विषयांवर सविस्तर माहिती दिली. 


यावेळी के.प्र. श्री. सोनवणे सर यांनी विविध प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली. तर विद्यांजली पोर्टल व PGI या विषयांवर श्री. वाडिले सर यांनी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थित शिक्षकांना दिली. ही शिक्षण परिषद आयोजक शाळा भारडू स्थळ, केंद्र शाळा हातेड येथे संपन्न झाली असून परिषदेस सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. परिषदेच्या समारोप प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परिषद संपन्न झाली. 


No comments