आदिवासी हक्कांच्या संघर्षाला यश, ‘नमुना क्रमांक ८’ वाटप; २६ जानेवारीचे आमरण उपोषण स्थगित तालुका प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भी...
आदिवासी हक्कांच्या संघर्षाला यश, ‘नमुना क्रमांक ८’ वाटप; २६ जानेवारीचे आमरण उपोषण स्थगित
तालुका प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भीम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राबविण्यात आलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. जिल्हाध्यक्ष मा. आयु. गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना ‘नमुना क्रमांक ८’ चे वाटप करण्यात आले.
प्रशासनाच्या या सकारात्मक व ऐतिहासिक निर्णयामुळे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे देण्यात आली आहे.
हा विजय भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर, तालुका अध्यक्ष मुबारक तडवी, तसेच आदिवासी समाजाच्या एकजुटीचा, संघर्षशील भूमिकेचा आणि भीम आर्मीच्या ठाम व शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा लढा यापुढेही कायदेशीर व लोकशाही मार्गाने अखंडपणे सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात मोलाचे सहकार्य करणारे माजी उपसरपंच राजेंद्र बाविस्कर, मुकेश कोळी सामाजिक कार्यकर्ते, प्रदीप वानखेडे, पँथर सतीश अडकमोल, अफसर कुरेशी, साहिल तडवी, भीम आर्मीचे सर्व कार्यकर्ते व सहकारी, तसेच माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीचे कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


No comments