adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मंदिर चोरीचा पर्दाफाश..चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत..MIDC पोलिसांची दमदार कामगिरी

 मंदिर चोरीचा पर्दाफाश..चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत..MIDC पोलिसांची दमदार कामगिरी  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 मंदिर चोरीचा पर्दाफाश..चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत..MIDC पोलिसांची दमदार कामगिरी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-नवनागपूर येथील चेतना कॉलनी मधील मारुती मंदिर व महादेव मंदिरामधील चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई देखील केली आहे.फिर्यादी नामे दिलीप बाळाजी बर्डे (वय-४९ वर्षे,धंदा- मोबाईल शॉपी, रा.चेतना कॉलनी, नवनागापूर ता.जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की, ०२/०१/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास चेतना कॉलनीतील मारुती मंदिर व महादेव मंदिराचे दानपेटी फोडून पेटीतील ४,०००/- रु.कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. वगैरे मजकुरावरून एमआयडीसी पोलिस स्टेशन गु.र.नं. ००७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३०४(१), ३३२(२) प्रमाणे दि. ०३/०२/२०२६ रोजी दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा विधीसंघर्षीत बालक (वय -१५ वर्षे, रा.गजानन कॉलनी, नवनागापूर ता.जि.अहिल्यानगर) यांनी केला असून तो सध्या शिर्डी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि. माणिक चौधरी  यांनी तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना शिर्डी येथे पाठविले.सदर पोलिस पथकाने शिर्डी येथे जाऊन विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत त्याचे पालकासमक्ष चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम ४,०००/- रु विधीसंघर्षीत बालकाकडून हस्तगत केली.

सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक, श्री.वैभव कलुबरमे अपर पोलिस अधीक्षक, श्री.शिरीष वमने  उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.माणिक चौधरी प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन, पोलीस अंमलदार राकेश खेडकर, राजू सुद्रिक, संदीप पवार, सचिन अडबल, संतोष शिंदे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आढव, अक्षय रोहोकले, चापोहेकॉ राहुल ढाकणे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडू, पोकॉ.नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.

No comments